प्रश्नोत्तरेमाझी लकडा लहान आहे ते मोठे करा चा आहे.उपाय सांगा

1 उत्तर

तुम्हाला पुरुषाच्या लिंगाच्या आकाराबद्दल विचारायचे असावे असे समजून उत्तर देत आहे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्नउत्तरे अवश्य वाचा.

इथे एका गोष्टींवर तुमचे लक्ष वेधावे वाटते. पुरुषांच्या जनन अंगाला लिंग आणि वृषण असे अधिक योग्य आणि सोपे, सुटसुटीत शब्द उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा शिव्यांमध्ये किंवा हीन अर्थी वापर सहसा केला जात नाही.

 

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 16 =