आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या लैंगिक अभिव्यक्तीवर अनेक बंधन दिसून येतात. स्त्रीचं पावित्र्य हे कौमार्याशी जोडलं आहे त्यामुळे लग्नाआधीच्या संबंधांबद्दल भीती/ नकारात्मकता निर्माण होते. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे. लग्नाआधी लैंगिक संबंध झाले की नाही हे समजण्याचा कोणताही मार्ग नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा