प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे लग्न होउन 4 वर्षे झाली पण अजुन मि सेक्स करू शकले नाही

मि स्त्री लिंग,माझेlove marriage झाले,लग्नाअधि वाटलेआम्हा दोघांना की लग्ना नंतर भीतिजाईल पण आज4 वर्षे झाली भीति जात नाही, डॉक्टर हसतात, seal आपरेशन ने break करू एवढंच सांगतात ,नवरा आणि घराचे समजून घेतएत पण आता मि डिप्रेशन ची शिकार झाले आहे ,जगयची इच्छा नाही, मीचअशी का असे वाटते, मला खुप म्हणजे खुप penetration ची भीति वाटते ,बाकी सगळ्या कामुक ईच्छा शिगेला पोहोचतात, एकदावाटल मानसिक सम्सया असेल तसे मानसोपचार घेतला पण डॉक्टर ने अशी केस पहिल्यांदाच पहिली त्यानाही नाही समाधन मिळाले , भीति कायमच आहे,आता वय 30 झाले, आत्म हत्या करू वाटते ,खुप उत्तेजना वा ढवनारी औषधे घेतली मि काही उपयोग नाही,योग आणिव्यायाम पण ,,कृपया उपाय सूचवा.

1 उत्तर

तुम्ही विश्वासाने तुमचं मन इथे मोकळं करावसं वाटलं अन तुम्ही ते केलंत. आम्हाला छान वाटलं. तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या आयुष्यातील घटना – समस्या सांगितल्या यात थोडी गुंतागुंत जाणवत आहे. बहुतेक लिखाणाच्या मर्यादांमुळे कधी कधी सर्व सविस्तर मांडणं शक्य होत नाही. सेक्समध्ये बरोबर किंवा चुक असं काही नसतं. एक तर हे फक्त तुमच्याच बाबतीत घडतं आहे असं नाही हे आधी लक्षात घ्या. अनेकजण ह्या प्रश्नाला सामोरे जातात. अन अनेकांचा हा प्रश्न सुटलेला देखील आहे.

आम्ही असं सुचवू की, तुम्ही यावर सविस्तर बोलावं, आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. तुम्हाला जर कुणाशी बोलावंसं वाटत असल्यास पुढिल नंबर वर बोलु शकता. 7775004350 इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. तुमच्याशी स्त्री नेस्टर बोलेल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला. आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी