प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे वय १९ वर्ष आहे मला झोपेचा प्रॉबलेम आहे

माझे वय १९ वर्ष असून मागील ५ वर्षापासून मला झोपेचा प्रॉबलेम आहे मी पुर्वी ४ पाहाटे चार वाजता उठून योगा प्राणायम व टेकडी वर व्यायाम करण्या करिता जायचो माझी ही खुप चांगली सवय होती पन आता मागील पाच वर्षात मी कदाचितच यावेळेत किवा सकाळी झोपपुर्ण क़रून उठलो नाहीसे रोज रात्रभर जागरण होते त्यामुळे माझ्या शरिराची आणि मनाची कार्यक्षमता बिघडत चाललेली आहे घरी जेवन ११ वाजल्यानंतर तयार होते व सतत मोबाईल वापरामुळे जागण्सास सुरवात झाली खास करून पॉर्न फ्लिम्स पाहूनपहीला मी खुप हुशार होत वर्गात व शाळेत नेहमी परिक्षेत टॉप यायचो पुस्तके वाचन्याचा व नृत्य गायन वादन आसे निरनिराळे छंद जोपासण्सासाठी क्लासेस पन जॉईन केले होते तेथेही मी नेहमी सरांकडून शब्बासकी मिळवत असेनंतर पुढे व्यसनात अडकल्यावर सगळे सोडले नववीत नापास झालो तर दाहाीला बाहेरून बसलो २०१३ ला मी दाहावीतही गणित या विषयात नापास झालो वडिलांनी मदत करायचे सोडून दिले तेव्हापासून नंतर मी सातवेळा गणिताचा पेपर दिला तरिी मी तो एक विषय सोडवू शकलो नाही गणित य़ा विषयात मि फार कच्चा आहेमी कॉपी करत नाहीत्यानंतर मी काम करत आहे आता परत तयारि नुसार क्लासेस जॉईन करून दाहावी देऊन कॉलेज करू इच्छितो मी काम करतो व माझा पगार मला सगळा घरी देवा लागतो त्यामुळे मला शिल्लक काहीशेच पैसे उरतातअशा परिस्थितून जात आहे पुढे माझ शिक्षण व कॉलेजाचा खर्च क्लासेसचा खर्च मलाच करायचा आहेमी अत्ता मनाशी जिद्द बाळगली आहे सिविल सर्विसेस च्या परिक्षा द्यायच्या व व्यसना मुळे हाडकुळे झालेले शरिर सुधरवायचे आहे त्सा करिता मला तुमच्या सामुपदेशाची गरज आज भासत आहे मी जाणतो माझा प्रश्न खुप मोठा व गुंता गुतीचा आहे अशा प्रकारचा प्रश्न आपन पहील्यांदा पाहीला आ़सेल पन या प्रश्नाचे तुम्ही केलेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी खुप फायद्याचे ठरणार आहे त्यासाठी तुम्ही प्लिज प्रश्न समजून घेऊन उत्तरे द्यामला लहान वयातच वयाच्या ११ व्या वर्षी तंबाखूचे व्यसन शाळेतील मुलांच्या वाईट संगतीतून आले नंतर मी सिगरेट बीडी गुटखा मावा अशी व्यसन करत वयाच्या १४ व्या वर्षी दारू पिवू लागलोनंतर मला तिन वर्षापासून गांजा चिलम L.S.D चे व्यसन लागले आहे आणि पॉर्न फ्लिम्स पाहन आणि हस्तमैथून करने हे माझे दररोज चे झालय मला माझे व्यसन आता सुटत चालले आहे तुमचे लेख वाचुनही मला माझी मानसिक कोंडी दूर होते मी आता हळू हळू सगळी व्यसन सोडत आहे पन यामुळे या पाच वर्षात माझ्या झोपन्याच्या पद्धतीत खुप बदल झालेला आहे मला माझी झोपही वाढलेली आहे त्यामूळे माझ्या कामात मला निरउत्साही वाटते कामात मन लाह़गत नाही शिक्षणातलक्ष लागत नाहीये घरी परस्थिती हलाकिची आहे घरी मी मोठा असल्याने सर्वजवाबदार्या माझ्या बरोबर येत आहे टेशंन घालविण्यात आणि शांत राहाण्यातच खुप शक्ति खर्च होते मी सतत उदास असतो मला अल़से वाटते कि मी माझ्या झोपेचे नियोजन जेवन वेळेवर व व्यसन सोडने हे खुप वेळा प्रयत्न केला आहे पन सुटत नाहीये वरून पॉर्न फ्लिम्स पाहून आपल्या होणार्या बायकोबरोबर तशाच प्रंकारचे सेक्स करावसे वाटते पन मला ठाऊक आहे कि मला तसे करवयास भेटनार नाही त्यामुळे असवस्थ आहे माझे सगळे मित्र त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर संभोंग करतात व ते मला देील मुलगी पटवून संभोग करण्यास सांगतात पन मला ते लग्नाअगोदर नको वाटते होणार्या बायकोशिच प्रमाणिक राहायच ठरवलय पन लैगिक इच्छा खुप होते त्यामुळे हस्त मैथूनाचा अतिरेक होत आहे मला आजवर चार मुलींनी प्रपोज केले आहे काहीनीतर डायरेक्ट सेक्स ऑफर केले आहे पन मला ते नकोय करू कि नको हे दडपन आहे आसे नाही की मि घाबरतोय पन मला ते आता नकोय लग्नानंतरच पन मी लग्न ही संपती साठविल्यानंतरच करू इच्छितोया सर्व भविष्यातिल गोष्टिचे ओझे मी मनावर वाहत आहे मला सामुपदेश करा मि खुप असवस्था जिवन जगत आहे मला माझ्या सवयीबदलणे व त्यासाठी कसे नियोजन असले पाहीजे त सांगा

1 उत्तर

मित्रा, सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. तुला या सगळ्यातून बाहेर पडायची इच्छा आहे हे सगळ्यात महत्वाचं. लैंगिक इच्छा होणं, हस्तमैथुन करणं यात काहीही चुकीचं नाही असं आपण वेबसाईट वर नेहमी म्हणतो. तुला माहीतच असेल पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र नको… कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल त्यातून बाहेर पडायलाच हवं. पूर्वीसारखं लवकर उठून किंवा लवकर उठणं शक्य नसेल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा व्यायाम कर. तुझे लक्ष इतर क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न कर. वाचन कर, अभ्यासात लक्ष केंद्रित कर, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न कर. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुझ्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.

मित्रा, जवळजवळ पाच वर्षांपासून तुला व्यसन करण्यची सवय लागली आहेस असं म्हणतोस. कदाचित तुझ्या पातळीवर प्रयत्न करून हे व्यसन सुटणार नाही अशावेळी एखाद्या व्यसन मुक्ती केंद्राची मदत घेता येईल. हे सगळं तू अगदी मोकळेपणाने बोलतोयस हे ऐकून बरं वाटलं. तुला अजून कोणाची तरी प्रत्यक्ष भेटून मदत घेता येईल. एखाद्या समुपदेशकाला भेट. तू ज्या भागात राहतोस तेथील व्यसनमुक्ती केंद्राशी देखील संपर्क करू शकतोस. तुला काही हेल्पलाईन नंबर्स पाठवत आहे त्यांना फोन कर तुला त्याची मदत होईल.

हेल्पलाईन नं- 9763640480 (सोमवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेतच फोन करा)

‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

युवकांसाठी हेल्पलाईन – ८१४९७५६७९६

आणखी मदत लागली तर आम्हाला नक्की लिही. तुला खूप खूप शुभेच्छा… काळजी घे…

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 19 =