प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे वय 23 आहे. माझ्या लिंगावरची त्वचा मागे जात नाही तर त्याचा माझ्या भविष्यात मला काही अडचण निर्माण होईल का
1 उत्तर

लिंगामध्ये ताठरता असताना की शिथिल असताना त्वचा मागे जात नाही याबद्दल तुझ्या प्रश्नामध्ये उल्लेख नाही. कारण शिश्नमुडांवरील (लिंगाच्या सुरुवातीचा फुगीर भाग) त्वचेखालील चिकट भागात घाण साचून राहण्याची शक्यता असते. म्हणून ही त्वचा हळूवारपणे मागे ओढून शिश्नाचे टोक स्वच्छ धुवावे लागते. शिश्न उत्तेजित नसताना ही स्वच्छता करणं जास्त सोपं जातं.

अनेकवेळा पहिल्या दोन-तीन संभोगाच्या वेळी त्वचा मागे जात नाही, मात्र संभोगाची सवय झाल्यावर हळूहळू मागे जाऊ लागते. संभोग करताना त्वचा मागे न जाता संभोग विनात्रास होत असेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. लिंगामध्ये ताठरता आल्यावर हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना त्वचा मागे न गेल्यामुळं काही त्रास होत असेल तर ती त्वचा डॉक्टरांकडे जाऊन काढून टाकता येते. वैद्यकीय पध्दतीने अशी शस्त्रक्रिया केल्यास काही धोका नसतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 12 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी