प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझे वय 24 असुन लिंग ची साईज 1 ते 1,5इंच आहे.ल ग्न करावे की नाही

राज

1 उत्तर

उत्तेजित लिंग १ ते १.५ इंच आहे का? लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. उत्तेजित लिंग जर १ इंच असेल तर ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र तुमचे लिंग उत्तेजित नसताना १ इंच असेल आणि उत्तेजित झाल्यनंतर ३- ५ इंच असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्नउत्तरे अवश्य वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 3 =