प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या कडुन चुकुन ऐकवेळा विना निरोध लावता संभोग झाला .व नंतर मासिक पाळिपाळि चा कालावधी ऊलटून तीन दिवस वर झाले पन पाळी आली नाही. मला काय करावे सुचेना .मला ही गर्भ धारणा नको आहे कारण माझे बाळ पाच महिन्याचे आहे
1 उत्तर

अनेकवेळा मानसिक ताण-तणावामुळं मासिक पाळी चक्र मागे पुढे होवू शकतं. तुम्हाला जर गर्भधारणेची शंका वाटत असेल तर मेडीकल शॉपमध्ये उपलब्ध असलेल्या प्रेगनंसी कीटचा वापर करुन तपासणी करता येईल. प्रेगनेन्सी कीटचा रिझल्ट पॉजिटीव्ह आला तर डॉक्टरांकडून तपासणी करुन त्यांचा सल्ला घ्या. महत्वाचं, याबाबतीत तुमच्या जोडीदाराशी बोला. जोडीदाराला गर्भनिरोधकाचं महत्व समजून सांगा. आणि प्रत्येकवेळी सुरक्षित संभोगासाठी नियमित कंडोमसारखी गर्भनिरोधके वापरा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी