प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या गर्लफ्रेंड च्या छातीवर खुप केस आहेत याचा अर्थ तिला जास्त लैंगिक भावना आहे असा होतो का, ज्योतिशास्त्र असे म्हणते की स्त्रीच्या छातीवर हलके केस असतील तर ती स्त्री जास्त पुरुषांसोबत रमण करणारी असते. ती स्त्री तिच्या पतीला धोका देण्यात माहीर असते हे खरे आहे का?

2 उत्तर

मित्रा, सावध हो. तथ्य समजून घेण्याआधी, पुरेपूर शास्त्रीय माहिती घेण्याआधी मनात संशयाची पाल चूकचुकू देऊ नको. तुझ्या नव्याने फुलणाऱ्या नात्यासाठी ते घटक आहे. संशय हा नात्याचा शत्रूच आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

स्त्रियांच्या शरीरावर केस कसे येतात किंवा लैंगिक इच्छा कशामुळे वाढते याविषयी तर आपण बोळूयातच पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नातील गैरसमजा विषयी बोलूयात. शरीरातील काही हॉर्मोन्सच्या बदलांमुळे शरीरावर केस येतात किंवा लैंगिक इच्छा वाढते हे जरी खरे असले तरी ती स्त्री अनेक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवेलच असा अंदाज बांधणे आणि तो सरसकट सगळ्यांनाच लागू करणे हे मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून नाही. लैंगिक इच्छा होणं आणि प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजेत.

स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात. अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. अंगावर केस असतील व इतर काही त्रास नसेल तर घाबरण्याचं, काळजी करण्याचं कारण नाही. आपण जसे आहोत तसं स्वतःवर प्रेम करायला/ स्वीकारायला हवं. त्यामुळं स्वतःची लाज वाटून घेण्याची कारण नाही. पण तरीही तुम्हाला केस घालवायचे असतील तर आणि वर नमूद केल्यापैकी इतरही काही त्रास जाणवत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही शारीरिक लक्षणं बघून तुझी तुला धोका देईल असा अंदाज बांधू नको. तिच्याशी मोकळेपणाने बोल. तुमच्या नात्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 18 =