प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसरासरी लिंगाची साईज किती असायला हवी आणि लिंग ताठल्यावर डाव्या साईटला झुकलेला असतो हे नॉरमल आहे का, व लिंगाला तेल मालिश करणे योग्य आहे का याचा काही फायदा किंवा तोटा होतो का?

माझ्या लिंग सैल असतांना त्याची साईज हि २ते २.५ इंच असते व   ताठ झाल्यावर ४.५ ते ५ ” ईतकी साईज असते. ही साईज मापात आहे का?, तरि सरासरी लिंगाची साईज किती असायला हवी आणि लिंग ताठल्यावर डाव्या साईटला झुकलेला असतो हे नॉरमल आहे का,व लिंगाला तेल मालिश करणे योग्य आहे का याचा काही फायदा किंवा तोटा होतो का?

2 उत्तर

तुमचा साईज परफेक्ट आहे या उत्तराने तुम्हाला चांगले वाटणार असेल तर माझे उत्तर तेच आहे असे समजा. कारण सेक्स मध्ये आकार नाही तर आनंद महत्वाचा. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे.
लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे. लिंगाला तेल मालिश करण्याने कुठलाही फायदा किंवा तोटा नाही. मात्र स्वतःच्या शरीराशी कुठलीही जोर जबरदस्ती महागात पडू शकते हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 14 =