प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ लग्नाला महीना झाला मि अत्यंत गोरी आहे पण योनी काळी आहे नवर्याने पहील्या राञी पाहीली तेव्हा पासुन तो खुप निराश आहे सेक्स एकदा ही केला नाही काय करु कसं समजावे हेल्प प्लिज?

1 उत्तर

हा प्रश्न आपल्या वेबसाईटवर अनेक वेळा विचारला गेला आहे. हा प्रश विचारणं स्त्रियांसाठी खरं तर खूप अवघड असतं याची आम्हाला कल्पना आहे. शिवाय तुमच्या प्रश्नावरून तुम्हाला या सर्वाचा काय त्रास होत असेल याचीही कल्पना आम्ही करू शकतो.

योनीजवळचा भाग सावळा किंवा काळा असणं खूपच नॉर्मल आहे. सगळ्याच स्त्री पुरुषांमध्ये लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचा भाग काही प्रमाणात काळा सावळा असणं सामान्य आहे. त्यात काही चूक आहे किंवा तुमचा त्यात काही दोष आहे असे नाही. एकुणातच आपला रंग कसा ठरतो हे समजून घ्या आणि तुमच्या जोडीदारालाही ते समजावून सांगा. आपण ज्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशात राहतो, आपल्या शरीराची जनुकीय रचना, शरीरात रंगद्रव्याचं प्रमाण या किंवा अशा अनेक गोष्टींवरुन आपल्या शरीराच्या त्वचेचा रंग ठरत असतो. शरीरातील रंगद्रव्ये मुख्यत्वे अनुवांशिकरित्या येतात. ही रंगद्रव्ये हवामानातील बदलामुळं काही पिढ्यांनतर बदलू शकतात. रंगद्रव्यातील मेलॅनिन रसायनाच्या मात्रेवरुन त्वचेचा रंग बदलत जातो. लिंगाच्या आणि योनीच्या रंगाचंदेखील असंच आहे.

लिंग आणि योनी शरीराच्या एका ठराविक भागामध्ये आहेत. शरीराच्या तापमानापेक्षा इथलं तापमान थोडं वेगळं असतं. त्यामुळं शरीराच्या त्वचेपेक्षा लिंगाचा किंवा योनीचा रंग वेगळा असू शकतो. तुम्ही शरीराची अधिक पाहणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तळपायाचा रंग आणि पायाचा रंग हा देखील वेगळा आहे. शरीरातील सर्वच अवयवांचा रंग एकंच एक असावा याला काही अर्थ नाही.

अनेकवेळा पॉर्न क्लिप्स किंवा ब्लू फिल्म पाहून पुरुषांच्या काही कल्पना तयार होतात. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न किल्प्स ‘बनवलेल्या’ असतात. कलाकार घेऊन, मेकअप करून त्या बनवल्या जातात. शिवाय अनेकवेळा त्यात दाखवलेले लिंगाचे किंवा योनीचे आकार, रंग तितकेसे खरे नसतात. त्यामुळं अशा क्लिप्स पाहून मनामध्ये कोणताही न्यूनगंड किंवा अहंकार तयार करण्याची गरज नाही. गोरा रंग म्हणजे सुंदरता असा समज चुकीचाच नाही का? सुंदरतेच्या पुरुषी आणि बाजारू कल्पना आपण सर्वांनी टाकायला हव्यात. या मुद्द्यांवर तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा.

बाजारात रंग उजळवून देणाऱ्या, गोरेपणा देणाऱ्या क्रीम्स मिळतात पण त्यातून अनेकदा नुकसान होऊ शकते. रसायन मिश्रित क्रीम्स ने जळजळ होणे, व्रण उठणे, पुरळ येणे असा त्रास होऊ शकतो. त्यातून त्वचेचे नुकसानच आहे. योनी आणि जवळची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे अधिक काळजी घेतलेली बरी. आयुर्वेदिक म्हणवणाऱ्या मलमांपासूनही सावध राहणे गरजेचे आहे. कोरफड ई असलेल्या क्रीम्स चा वापरही विचारपूर्वकच केलेला बरा. इतर जागी थोडेसे क्रीम अप्लाय करून पाहू शकता. सुत होत असेल तर पुढे जा. घट्ट-तंग कपडे घालणे टाळा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 10 =