प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ वय 22 आहे तरी पण अजुन दाढी आलेली नाही काय करायला लागेल
1 उत्तर

मुलग्यांना चेहऱ्यावर मिशा आणि दाढी किंवा छातीवर आणि एकूणच अंगावर केस असण्यासाठी एक विशिष्ट संप्रेरक कारणीभूत असतं. त्याचं नाव आहे अँड्रोजन. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. यामुळे पौगांडा अवस्थेत शरीराच्या बऱ्याच भागावर केस यायला लागतात. दाढी, मिशा येणे, काखेमध्ये, लिंगाजवळ, आणि गुदद्वाराच्या आसपास केस यायला चालू होतात. काही मुलांना छाती आणि पाठीवरही केस येतात. किंवा काही मुलांच्या अंगावर कधीच केस येत नाही. केस केव्हा आणि किती येतील, या गोष्टी अनुवांशिक गुणधर्मावर आधारित असते. काही मुलांना वयाच्या 11 वर्षी तर काहींना 15 वर्षी केस येणं चालू होतं. काही जणांच्या शरीरावर फारसे केस नसतात. अंगावरच्या केसांचा किंवा दाढीमिशांचा पुरुषत्वाशी थेट संबंध नसतो. तुम्हाला मिशा अथवा दाढी येत नाही आहे असे दिसत असेल तर कृपया तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उचित ठरेल. ते तुम्हाला योय मार्गदर्शन करतील. ह्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग अथवा सल्ला कोणी देत असेल उदा. अमुक तेल वापरा अथवा तमुक फळ खा तर सजग असा इतकेच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 10 =