प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ वय 45 आहे मिस्टरांचे 59 आहे. आमच्यात गेली 5/6 वर्षे काहीच नाही. पण माझी ईच्छा होते काय करु?
1 उत्तर

तुमच्या दोघांच्या वयाचा विचार करता, तुम्ही स्वतः रजोविरामाच्या/मेनोपॉज(पाळी जाणे) कालखंडातून जात आहात. याकाळात लैंगिक इच्छा होणं म्हणजे काहीतरी ‘चूक’ आहे असं वाटू शकतं. पण असं वाटणं चूक नाही. ‘त्यात काय एवढे, असे वाटू शकतं’ हे नक्की. या काळात लैंगिक संबंध किंवा समागम करण्याची इच्छा होऊ शकते जी खूप नैसर्गिक आहे. समागम हा सहजीवनाचा एक अंग/ भाग आहे. या काळात लैंगिक ओढ वाटू शकते.

आपल्याला निर्माण झालेली भावना जोडीदाराला होते की नाही किंवा मी बोलल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. तुम्ही लिहिल्याप्रमाणे मागील पाच ते सहा वर्षापासून तुम्हा दोघांमध्ये लैंगिक संबंध नाहीत. यामुळं तुम्हा दोघांना विशेषतः जोडीदाराला लैंगिक संबंध ठेवण्यास अडचण येईल का? किंवा त्याला काय वाटेल? असं वाटणं साहजिकच आहे. तुमच्या जोडीदाराच्या वयाचा विचार करता, या वयात पुरुषाच्या लिंगामधील ताठरपणा काहीसा कमी होवू शकतो किंवा वीर्यपतन लवकर/झटकन होऊ शकतं. मात्र लैंगिक भावना निश्चितच कमी झालेली नसते. यामुळे कोणताही न्यूनगंड आणि संकोच न बाळगता तुमच्या जोडीदाराशी बोला. जोडीदाराशी संवाद वाढवण्यामध्ये पुढाकार घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 19 =