मासिक पाळी चुकली आहे

461
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळी चुकली आहे
मासिकपाळी asked 6 months ago

2 महिन्या आधी सेक्स केला होता त्यानंतर माझ्या सेक्स पार्टनर ना 2 महिने मासिक पाळी आली त्यानंतर 2 महिने पाळी अजून आली नाही त्या मधे गर्भधारणा झाले असेल का ??

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का ? याची खात्री करायला हवी.

जर मासिक पाळीची तारीख उलटून गेलीये तर प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल.

जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा. पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

हे ही लक्षात घ्या की, गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. तेव्हा चिल्ल राहा.

मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.