Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › मी तिला i-pill चि गोळि दिली, तर परत चार दिवसांनी सेक्स झाला. काय करू
मी तिला i-pill चि गोळि दिली, तर परत चार दिवसांनी सेक्स झाला. काय करू asked 8 years ago
0 Vote Up Vote Down
1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for मि तिला ipill चि गोळि दिलोय तर परत चार दिवसानि सेक्स झाले तर काय करू answered 8 years ago

तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं मासिक पाळी चक्र माहित असेल तर सुरक्षित काळ ओळखणं सोप्प जाईल. जसं मासिक पाळी ठराविक दिवसांनीच येत असेल तर पुढची तारीख येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होत असतं. याला स्त्रीबीज म्हणतात. स्त्रीबीज १२ ते २४ तास जिवंत असतं. या काळात जर पुरुषाच्या शुक्राणूचा संपर्क आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. जर या व्यतिरिक्तचा काळ असेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. परंतू तुम्ही नुकतीच गर्भनिरोधनाची इमर्जन्सी गोळी घेतली आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर राहील.

हे मात्र नेहमी लक्षात ठेवा…

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर ७२ तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. बाजारामध्ये अनेक इतर कमी गर्भनिरोधके उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.comcontraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

10 + 8 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही