प्रश्नोत्तरेमीझे लग्न आहे एक महीन्यात पन या अगोदर माझा एका मूलाशी २ वेळा संबध २ आलेला… परत जर का नवरा त्याच्याशी संबध आल्यावर …त्याच्या ही बाब समजू शकते का….?? मनात फार भीती वाटत आहे….!!

1 उत्तर

लैंगिक संबंध हा संमतीने आणि सुरक्षितपणे म्हणजेच योग्य ते गर्भनिरोधक वापरून केला असेल तर काळजीचे कारण नाही. संबंध किती वेळा आला यापेक्षा तो मासिकपाळीचक्राच्या कोणत्या कालावधीत आला? किंवा योग्य ते गर्भनिरोधक वापरले होते का? लिंग सांसर्गिक आजार असणाऱ्या व्यक्तीबरोबर आला का? याचा विचार करणे गरजेचे आहे. आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला हे समजू शकत नाही. आधीच्या आयुष्यातील लैंगिक संबधामुळे भावी नात्यामध्ये  फरक पडेलच  असं नाही. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात यामुळे घाबरु नका  किंवा तुम्ही काहीतरी चूक केली आहे असं समजू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 19 =