प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी हाताने हलवतो, ते बंद करायचं आहे काय कराव
1 उत्तर

हाताने हालवता याला हस्तमैथुन करणं असं म्हणतात. हस्तमैथुन करण्यामध्ये गैर असं काही नाही. ज्यावेळी लैंगिक भावनांचा ताण जाणवेल त्यावेळी असा ताण कमी करण्यासाठी हस्तमैथुन करणं फायदेशीर ठरु शकतं. एकाकीपणा, निराशा किंवा इतर काहीच काम नाही म्हणुन हस्तमैथुन केल्यामुळं दैनंदिन कामामध्ये अडथळा येऊ शकतो. अशावेळी इतर कामांमध्ये मन गुंतवा. जसं मित्र-मैत्रिणींना भेटायला जाणं, त्यांच्याशी गप्पा मारणं. पुस्तकं वाचा, छंद जोपासा. अश्या गोष्टींमुळं तुमचं मन रमेल.

हस्तमैथुन करणं वाईट असतं हे मनातून काढून टाका. हस्तमैथुनाबद्दल मुल आणि मुलींमध्ये अनेक गैरसमज आहेत. प्रत्येक गैरसमजाबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि चुकीचे समज दूर करा. लैंगिक भावना असणं किंवा अजिबात नसणं हे नैसर्गिक आहे. जर मनामध्ये लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल तर त्याला हस्तमैथुन हा उत्तम पर्याय आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 14 =