प्रश्नोत्तरेमुलगी जर चालु असेल तर तिला कशी ओळखायची

1 उत्तर

‘एखादी व्यक्ती चालू असणे’ याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. पण तुम्ही किंवा आपला समाज एखाद्या मुलाला आणि मुलीला ‘चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी’ समान नियम लावतो का ? यावर जरा विचार करा. ‘मुलगी चालू असणं’ म्हणजे नेमकं काय, असं तुम्हाला वाटतं ? फक्त मुलीच चालू असतात का ? एखादा मुलगा चालू असल्यावर कसं ओळखणार ? याची उत्तरं शोधा.

समजा, तुम्ही मुलगी चालू आहे की नाही हे ओळखता आलंच, तर त्याचा काय उपयोग ?

चालू… बंद… कशाला उगाच त्या कटकटी ?

कोणतीही व्यक्तीचे वागणे किंवा कृती हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्या व्यक्तीला स्वतःचे आयुष्य कसे जगायचे हा अधिकार देखील आहे. त्यावर त्या त्या व्यक्तीने विचार करावा आणि त्याची जबाबदारी देखील घ्यावी. आपण समोरच्या व्यक्तीचे वर्तनाचे अर्थ का लावावेत ? आपण आपले वर्तन आणि त्याची जबाबदारी घ्यावी. नाही का ?

कोणत्याही व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल, समजून घ्यायचे असेल तर काय करायचे याचे उत्तर सांगता येईल. आणि ते आहे संवाद करणं, मैत्री करणं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =