प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीची प्राप्ती कशी होते

1 उत्तर

होणारं बाळ हे स्त्री असेल कि पुरुष हे पुरुषबीजातील गुणसूत्रावरून ठरतं. स्त्रीबीजामध्ये xx ही गुणसूत्र असतात तर पुरूषबीजामध्ये xy ही गुणसूत्र असतात. स्त्रीकडील x आणि पुरुषाकडील x गुणसुत्राच्या एकत्र येण्यातून मुलगी होते तर मुलगा होण्यासाठी स्त्रीकडील x आणि पुरुषाकडील y गुणसूत्र एकत्र येणं आवश्यक आहे. मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषाकडून येणाऱ्या गुणसूत्रामुळ ठरतं. त्यामुळे मुलगा व्हावा की मुलगी हे स्त्रीच्या हातात नाही. ती जशी यासाठी जबाबदार नसते तसंच हे पुरुषाच्या ही हातात नसतं कारण गुणसुत्राची निवड कोणाच्याही इच्छेने होत नसते. शरीर संबंधांच्या वेळेस कुठलं गुणसूत्र असलेलं पुरूषबीज स्त्रीबीजाशी जाऊन मिळालं हे सांगण आणि ते अगोदरच ठरविणं अश्यक्य नसलं तरी खूप कठीण आहे.
पण तुम्ही पहात असाल आपल्या समाजात मुलीच्या जन्माचं स्वागत बरेचदा होत नाही. तिच्या जन्माची बातमी ऐकून नाक मुरडणारे किंवा कपाळाला आठी पाडून घेणारे अधिक. शिवाय मुलीच जन्माला घालते म्हणून स्त्रियांनाच दोष दिला जातो. मुलगा आहे कि मुलगी यावरून त्या बाईचं स्थान मानाचं असेल की अवमानाचं हे ठरवण्याचीही आपलीच परंपरा आहे. आपण या परंपरांचे पाईक होणार आहोत की खरंच पुढचं पाऊल उचलणार आहोत हे ठरवण्याची हीच वेळ आहे असं आमचं मत आहे. अर्थात तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल…..

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 16 =