तुम्हाला काय वाटते की co education असावं की मुलगा मुलगी वेगळे शिकावे…कृपाया सविस्तर सांगा
आम्ही मुलांनी एकत्र शिकावे या विचाराचे आहोत. मुलगा काय किंवा मुलगी काय ह्या सामाजाचे समान भाग आहेत. माणूस म्हणून ते समान आहेत, नागरिक म्हणून ते समान आहेत. त्यांना समान अधिकार आहेत. शारीरक फरक सोडला तर त्यांच्यात असा कुठलाही इतर फरक नाही ज्यामुळे त्यांनी आपले अनुभव वेगळे ग्रहण करावेत, शिक्षण वेगळे घ्यावे. वास्तवात आपल्यासारख्या पुरुषप्रधान समाजात जिथे मुलीना आणि स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम दर्जा दिला गेला आहे, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अन्याय केला गेला आहे तिथे मुलींना समान संधी आणि समान वागणूक दिली जायला हवी असं आमचं मत आहे. सुरक्षितता किंवा प्राधान्यच्या नावाखाली मुलींना मुलांपासून पृथक वागवण्याचे काही कारण नाही. समाजापासून दूर ठेवून सुरक्षितता नाही मिळू शकत, समाजच सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे.