प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीच्या वयानुसार योनीत बदल होतो का लग्नानंतर वनमुली किती वेळ सेक्स करु शकतात

robheenny replied 7 months ago

cialis and School of Medicine S

1 उत्तर

लग्नानंतर योनीत बदल होत नाही. मुली वयात येताना त्यांच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये बदल होऊ लागतात. तसेच जसजशा मुली मोठ्या होऊ लागतात तसा योनीचा आकार ही वाढतो. जसे आपल्या शरीराचे इतर अवयव लहानपणापासून मोठे होइपर्यत वाढतात तसेच प्रत्येक मुली/स्त्रिया यांच्या शरीरानुसार योनीच्या आकारात बदल होतो आणि ठराविक काळानंतर शरीराची वाढ पूर्ण होते त्याप्रमाणे योनीच्या आकारातील बदलही पूर्ण होतात. त्यानंतर त्यात काही बदल होत नाहीत.

मुळातच कोण किती वेळ सेक्स करू शकतो यापेक्षा तुम्हा दोघांनाही लैंगिक सुखाचा आनंद एकमेकांना कसा देता येईल याचा विचार करावा. तसेच स्त्री आणि पुरुषाच्या लैंगिक सबंधामध्ये लैंगिक सुख हे एकाच वेळेस दोघांनाही मिळेल असंlllll नाही. पुरुषांना वीर्यपतन झाले की लैंगिक सुख मिळते तर स्त्रियाना लैंगिक सुख मिळण्यात वेळ लागतो. दोघांमध्ये संवाद असेल, लैंगिक गोष्टींबद्दल मनमोकळेपणा असेल तर तिला सेक्स करताना कशातून आनंद मिळेल याबद्दल तिला आणि तुम्हाला बोलता येईल. पोर्नफिल्म मध्ये दाखविलेले सबंध खरे नसतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 20 =