प्रश्नोत्तरेमुलीनां खुप इच्छा असते पण त्या व्यक्त करत नाहीत संबंध सुरू केल्यावर दाखवतात असे का होते

1 उत्तर

पहिल्यांदा तुझ्या प्रश्नातील भाषेविषयी थोडंसं बोलू यात. असे कंड सारखे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. काहींना पर्यायी शब्द माहित नसतात हे आम्ही समजू शकतो. पण मुद्दामहून जर कोणी असे शब्द असेल तर मात्र पर्यायी शब्द शिकून घ्यायला पाहिजे आणि त्याची सवय करायला पाहिजे. प्रत्यक्ष संबंधांमध्ये ज्या स्त्रीशी संबंध करशील तेव्हा तिच्याविषयी तिच्या शरीराविषयी आदरच असायला पाहिजे.

आपल्या समाजामध्ये मुलींवर असणारी बंधनं आणि त्यांना मिळणारं दुय्यम स्थान यामुळं त्यांना लैंगिक इच्छा व्यक्त करण्यामध्ये काही मर्यादा येतात. लैंगिक इच्छा व्यक्त करणाऱ्या स्त्रिला समाज चांगल्या दृष्टीने बघत नाही. त्यामुळे त्या मोकळेपणाने आपल्या लैंगिक भावना व्यक्त करत नसाव्यात.

स्त्रियांची लैंगिक इच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक ? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास, स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त किंवा कमी लैंगिक इच्छा असते असे सरसकट विधान करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीनिशी मग ती स्त्री असो वा पुरुष वेगवेगळी कमी अथवा अधिक असू शकते. स्त्रियांची लैंगिक इच्छा पुरुषांपेक्षा कमी किंवा जास्त असते असे म्हणण्याऐवजी ती वेगळ्या प्रकारची असते, असे म्हणणे अधिक बरोबर होईल. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाच.

https://letstalksexuality.com/sexual-desire-male-female-difference/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 14 =