प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीला सेक्स करतानी लैंगीक समाधान कधी होते व कसे होते?

1 उत्तर

आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या लैंगिक इच्छेचा, आनंदाचा, लैंगिक सुखाचा किंवा एकूणच लैंगिकतेबद्दल फारच कमी दाखल घेतली जाते. बऱ्याचदा स्त्री लैंगिकसंबंधांमध्ये तृप्त किंवा समाधानी झाली की नाही? याचा विचार पुरुष करत नाहीत. याविषयी तिच्याशी बोलणे अपेक्षित आहे. लैंगिक जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक सुखाचा आणि आनंदाचा विचार करणे गरजेचे असते.

स्त्री लैंगिकदृष्टया उत्तेजित झाल्यानंतर सेक्स दरम्यान लैंगिक सुखाचा उच्चतम बिंदू आला की, तिच्या जननेंद्रियांच्या अवतीभोवतीच्या नसा आकुंचन पावतात व ती लैंगिक सुखाच्या लहरी अनुभवते. एकच नाही तर एका मागोमाग एक अशा अनेक लहरी ती अनुभवू शकते. जननेंद्रियांच्या अवतीभोवतीच्या नसा आकुंचन पावताना जर योनीत खूप स्त्राव झाला असेल तर तो स्त्राव योनीच्या बाहेर येतो(या स्त्रावाकडे बघून काहींचा गैरसमज होतो की, हे स्त्रीचं वीर्य आहे. स्त्रीमध्ये वीर्य तयार होत नाही). हा योनीस्त्राव असतो.

स्त्रीला उत्तेजित व्हायला पुरुषापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोघांना जवळपास एकाचवेळी परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवणं अवघड होतं. यासाठी ‘फोरप्ले’ म्हणजे संभोगाआधी एकमेकांना पूर्णपणे उत्तेजित करणे गरजेचे असते. याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाची लैंगिक सुखाची, तृप्तीची कल्पना वेगळी असू शकते त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे एकमेकांशी संवाद साधून शोधा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 15 =