प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमेथिच्या बिया रात्रभर पाण्यात भीजात ठेवून सकाळी अनाशापोटि नियमित खाव्यात याने सेक्स पॉवर वाढते.. ऎसे वाचनात आले यात काही तथ्य आहे का?
1 उत्तर

काही अन्न पदार्थ खाल्ल्याने लैंगिक इच्छा वाढतात असा प्रचार केला जातो तर काही वनस्पतींचा वापर सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी होतो अशी जाहिरात केली जाते. सेक्स पॉवर वाढवण्याची तुमची इच्छा आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मनात आलेले काही प्रश्न देत आहोत.

  • सध्या पॉवर कमी पडत आहे का?
  • सेक्स पॉवर म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे?
  • लिंगाचा ताठरपणा कमी होत आहे का लवकर वीर्य बाहेर येत आहे?

लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. वीर्य लवकर बाहेर येत असेल तर पुढील लेख जरूर वाचा – letstalksexuality.com/premature-ejaculation/
असा काही त्रास नसेल तरी सेक्स पॉवर जास्त हवी आहे यामागचं कारण काय आहे? सेक्समध्ये पॉवर आणि प्यारही पाहिजे. शक्ती, स्टॅमिना, किती जास्त वेळ, किती मोठं लिंग किंवा किती ताठर यापेक्षाही सेक्समधून मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. हा आनंद पॉवर वाढवूनच मिळेल असं काही नाही. एकमेकांना कशातून चांगलं वाटतं, शरीर आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचाही शोध घ्या. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधलात तर नक्कीच फायदा होईल.
मेथीच्या बिया रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने सेक्स पॉवर वाढते का ते माहित नाही मात्र रक्तातील साखर मात्र कमी होते. मधुमेह असणाऱ्यांसाठी हा उपाय सांगितला जातो. त्यामुळे असे काही उपाय करण्याआधी त्याची पुरेशी माहिती घ्या. नाही तर भलतंच काही तरी होऊन बसायचं.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 14 =