प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमोठे स्तन असनाऱ्या मुली,स्त्रिया सेक्सी असतात का? मोठ्या स्तनाचा सेक्सशी संबंधआहे का

1 उत्तर

मोठ्या स्तनांचा आणि सेक्सचा काही संबंध नाही. लैंगिक सुख मिळवण्यासाठी स्तनांचा आकार मोठा असण्याची गरज नसते. स्तनांचा आकार किती असावा याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. आणि ते होऊ शकत नाही. अनेकदा मोठ्या स्तनांचा संबंध लैंगिक सुखाशी जोडला जातो. लैंगिक सुखामध्ये स्तनांचा आकार महत्वाचा नसून लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या- घेण्याची संवेदनशीलता महत्वाची असते.

स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा किंवा लहान असण्यामागची अनेक कारणं असू शकतात. जसं अनुवांशिक जनुकीय गुणसुत्रं, शरीरामध्ये तयार होणार्या हार्मोन्सचं प्रमाण किंवा इतर काही वैद्यकीय कारणंदेखील असू शकतात. शरीरात तयार होणार्या चरबीचं प्रमाणदेखील स्तनांच्या आकारासाठी कारणीभूत असतं. त्यामुळं प्रत्येक स्त्रिच्या स्तनांचा आकार हा वेगवेगळा असू शकतो. हे अगदीच नैसर्गिक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 3 =