प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोगाने सेक्स पॉवर वाढतो का माझा मिञ दोन तास सेक्स करतो तरिही गळत नाही म्हनतो

*

1 उत्तर

मित्रा, आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाबद्दल बोलूयात.

योगाने सेक्स पॉवर वाढतो का?

सेक्स पॉवर वाढवण्याबद्दल तुझ्या मनात काही गैरसमज असेल किंवा न्यूनगंड असेल तर तो काढून टाक. मुळात जास्त वेळ संभोग केला म्हणजे जास्त आनंद मिळतो हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज आहे. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. बाजारात सेक्स पॉवर वाढवण्याच्या नावावर विकली जाणारी अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणं धोकादायक ठरू शकतं. व्य

व्यायाम, समतोल आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे तुम्ही निरोगी राहू शकता. आणि तुमची आरोग्य चांगले असेल तर सेक्समध्येही तुम्हाला जास्त आनंद मिळू शकेल. शरीरातलं रक्ताभिसरण सुरळित असेल तर लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभपणे होतात. सेक्स पॉवर वाढवण्यासाठीची औषधं आजारावर उपाय म्हणून वापरली जातात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही तसेच अशा औषधांचा उपयोग होत नाही. लिंगाचा ताठरपणा किंवा शिघ्रविर्यपतन यासारखी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घे.

तुझा दुसरा प्रश्न मित्र दोन तास सेक्स करतो तरीही त्याचे वीर्यपतन होत नाही, अशा समस्यांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटलेलं फायदेशीर राहिल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 4 =