प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोणीचा ओलावा: स्त्री ची योनींची ओली नाही झाली तर मुल होण्यासाठी काही अडचण येते का? मुल होण्यासाठी स्त्री ची योनीं ओली होणे गरजेचे आहे का?

स्त्री ची योनींची ओली नाही  झाली  तर मुल  होण्यासाठी काही अडचण येते का? मुल होण्यासाठी स्त्री ची योनीं ओली होणे गरजेचे आहे का?

1 उत्तर

स्त्रीची योनी ‘ओली होणं’ आणि मुल होणं याचा थेट संबंध नाही. मुल होण्यासाठी गरज आहे – स्त्री आणि पुरुष यांचे लैंगिक संबंध, स्त्री आणि पुरुष बीज आणि गर्भधारणेसाठी पोषक/ आवश्यक वातावरणाची. लैंगिक संबंधातील महत्वाचा भाग आहे ‘लैंगिक इच्छा किंवा उत्तेजना’ ज्याचा संबंध स्त्रीची योनी ओली होण्याशी आहे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंध फक्त मुलांना जन्म देण्यासाठी करण्याची बाब नाही तर ती परस्परांना आनंद देण्याची एक सुंदर बाब आहे.   स्त्रीच्या मनात लैंगिक इच्छा किंवा उत्तेजना ही लैंगिक भावना उत्तेजित करणारी फिल्म किंवा चित्र पाहणे / कल्पना करणे, हस्तमैथुन आणि फोरप्ले यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होऊ शकते. त्यानंतर योनीच्या आतील स्राव वाढून योनीमध्ये ओलावा तयार होतो. स्त्रीच्या योनीमध्ये संभोगादरम्यान ओलावा असेल तर संभोग सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो. लैंगिक सुखासाठी गरज आहे सेक्स करण्याची इच्छा, संमती आणि दोघांनाही तेवढीच ओढ. लैंगिक संबंध किंवा सेक्स म्हणजे फक्त संभोग नसतो. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. यामुळे स्त्रीच्या योनीमध्ये ओलावा तयार होतो आणि दोघांमध्ये उत्तेजना निर्माण झाल्याने संभोगाचा आनंद मिळवता येतो.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 8 =