प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरक्त कमी असेल तर मासिक पाळी ऊशिरा येते का?
1 उत्तर

हो. अंगात रक्त कमी असेल म्हणजेच अनीमिया किंवा रक्तक्षय असेल तर मासिक पाळी उशीरा सुरू होऊ शकते. शरीराच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठी रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं (किमान 12 च्या पुढे) असायला पाहिजे.
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी अाहारात लोहयुक्त अन्न पदार्थ (पोहे, मेथी, कांद्याची पात, पालक, गूळ, शेंगदाणे, अळीव, काळे तीळ, अंडी, कलेजी, इत्यादी) समाविष्ट करायला पाहिजेत. तसंच क जीवनसत्त्व असणारी आंबट फळं (आवळा, लिंबू, संत्रं, चिंच, कोबीची पानं, इत्यादी) खायला पाहिजेत. हिमोग्लोबिन 9 पेक्षा कमी असेल तर किमान 100 दिवस लोहाची एक गोळी रोज घ्यायला पाहिजे.
फक्त मासिक पाळी वेळेवर यावी यासाठी नाही तर एकूणच तब्येत चांगली रहावी म्हणून आहारात लोह आणि क जीवनसत्त्व वाढवायला पाहिजे. चहा आणि कॉफीसारखी पेयं कमी केली तरी फरक पडतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 17 =