प्रश्नोत्तरेरोज सेक्स करण चांगल असत

1 उत्तर

तुम्ही कितीवेळा किंवा किती दिवसांतून सेक्स करता यावरून चांगलं किंवा वाईट असं काही ठरत नाही. तुम्ही जितक्यावेळी संभोग करता त्यावेळी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंद मिळतो का? हे जास्त महत्वाचं आहे. सेक्स करणं ही शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. तशीच ती थकवणारी कृतीसुध्दा आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जितक्यावेळा आनंद मिळेल तितक्यावेळी केलेला संभोग नेहमीच चांगला असतो. परंतू यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जोडीदाराची संमंती आहे की नाही? जोडीदाराला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करुन किंवा अनेच्छेने सेक्स करायला लावू नये. याव्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे सतत सेक्स बद्दल मनात विचार येत असतील आणि त्यामुळं तुमची दैनंदिन कामं मागे पडत असतील तर यावर नक्की विचार करा. इतर कामांमध्ये मन गुंतवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 3 =