प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरोज सेक्स करुन योनी दुखते नवर्याला रोज सेक्स पाहीजे असतो काय करु

1 उत्तर

स्त्री जोडीदाराची लैंगिक इच्छा नसेल तर लैंगिक उत्तेजना नसल्याने योनीमार्गामध्ये नैसर्गिक ओलावा येत नाही. अशामध्ये संभोग (इंटरकोर्स) झाला तर योनीमध्ये वेदना होऊ शकतात. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे.

तुमची इच्छा नसेल तर त्याविषयी जोडीदाराशी बोला. नाही म्हणा.

कुठल्याही नात्यात अपेक्षित, गरजेच्या आणि ‘मस्ट’ अशा काही गोष्टी आहेत. लैंगिक भावना अशा जबरदस्तीने निर्माण करता येत नाहीत. उलट कुठल्याही दबावाखाली त्या मरतात. त्या सहज याव्या लागतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, तणाव रहित दैनंदिन जीवन, नात्यातील ओलावा, आपुलकी, प्रेम, समंजस जोडीदार, संमती ह्या गोष्टी सुखी आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी महत्वाच्या आहेत. लैंगिक इच्छा निर्माण होण्यावर या गोष्टींचा अधिक प्रभाव असतो. तुमच्या जोडीदाराला रोज लैंगिक इच्छा रोज होते म्हणून तुम्हाला तसेच वाटावे याची आवश्यकता नाही. तुमची समंती नसेल तर ती जबरदस्तीच ठरेल. त्यामुळे तुम्हाला होत असलेल्या त्रासाविषयी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 9 =