प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्न ठरवताना पत्रिकेतिल नाड एक असेल तर मूल होत नाही का ? ब्लड ग्रूप वेगळा असेल किवा सेम असेल तर काय होत. प्लीज मला मदत कारा .
1 उत्तर

एकनाड –
मुलाची आणि मुलीची एकनाड असेल तर संतती होत नाही किंवा आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात अशा समजुतीत काहीही तथ्य नाही. फलज्योतिषाप्रमाणे तीन नाड्या सांगितल्या आहेत. एक नाड असेल तर जोडप्याला मूल बाळ होत नाही हे जर खरं असतं तर जगातली जवळ जवळ एक तृतीयांश जोडपी विनापत्य असती. नाडी, मंगळ, 36 गुण अठरा गुण या सगळ्या मनाच्या भ्रामक कल्पना आहेत. एकमेकांशी असणाऱ्या नात्यात किंवा आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याला कुठे तरी बाहेरचा आधार शोधण्याचे हे बहाणे आहेत.
पत्रिकेत एकनाड असणाऱ्या अनेकांना मुलंबाळं झाली आहेत आणि अनेकांच्या पत्रिकेत एकनाड वगैरे काहीही नसताना त्यांना मूल झालेलं नाही अशी उदाहरणं आहेत. मूल न होण्याची कारणं पुरुष आणि स्त्रीच्या शरीराशी आणि त्यांच्यातील परस्पर नात्याशी, ताण तणावाशी संबंधित आहेत. कधी कधी सगळं व्यवस्थित असतानाही मूल होत नाही. मात्र एकमेकांच्या साथीने संसार सुरु करण्याआधीच नाड्या पाहून मूल होणार का नाही सांगायचं यावर विश्वास ठेवू नका.
यासंबंधी अधिक माहिती वाचा –
http://www.misalpav.com/node/6251
रक्तगट
आपला रक्त गट माहित असणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे पण लग्नासाठी दोघांचे रक्तगट जुळलेच पाहिजेत असा काही दंडक नाही. कोणत्याही रक्तगटाचा पुरूष कोणत्याही रक्तगटाच्या स्त्रीशी विवाह करू  शकतो. मात्र रक्तगटापेक्षा आरएच(RH) घटकाचा विचार व्हावा लागतो. प्रथम स्त्रीचा आरएच घटक पाहावा. तो पॉझिटिव्ह असला तर प्रश्न तिथेच मिटला. पण तो निगेटिव्ह असला तरच पुरुषाचा आरएच घटक विचारात घ्यावा. पुरुषही आरएच निगेटिव्ह असला तर प्रश्न उद्भवत नाही; पण तो पॉझिटिव्ह असला तर त्यांना होणार्‍या दुसर्‍या मुलात रक्तक्षय, कावीळ किंवा जन्मापूर्वी मृत्यू संभवतो. (पहिल्या मुलात कोणतेही वैग्युण्य नसते) यावर तोडगा सोपा आहे. स्त्री आरएचनिगेटीव्ह व पुरुष पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या बाळंतपणानंतर लगेच अ‍ॅंटी डी इम्म्युनोग्लोब्युलिनचे एक इंजेक्शन स्त्रीला दिल्यास तिचे दुसरे मूल नॉर्मल जन्मते. म्हणून रक्तगट जुळत नसले किंवा असले तरी लग्न करायला काही हरकत नाही.
लग्न ही क्रिया दोन माणसांमधली असते. ती विचाराने, समजुतीने, जबाबदारीने आणि मुख्य म्हणजे प्रेमाने करायाची असते. त्यावर ग्रह तारे, नाड्या दोरे, खडे, रत्नं अशांचा प्रभाव पडणं आम्हाला तरी अशक्य वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा.
 

satish Gade replied 8 years ago

बरोबर आहे

I सोच replied 8 years ago

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. वेबसाईटवरील इतर लेख आणि प्रश्नोत्तरे नक्की वाचा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 4 =