लिंगाच्या आकाराविषयी

794
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगाच्या आकाराविषयी
GAURAV SHEWALE FROM MALEGAON asked 6 months ago

नमस्कार,मी आपल्या साईटचा नियमित वाचक असून आपल्या साईट मुळे मला खूप ज्ञान मिळालेल आहे, आणि मी थोडा का होईना हे सर्व समजून घेणारा थोडाफार पक्व झालो आहे, असतो.

हल्ली मी तुमचे साईटवरचे प्रत्येक प्रश्न वाचतोय मला काही प्रश्न वाचताना खूप हसू येतंय या जगात असेही लोक वावरतात हे बघून खूप आश्चर्य वाटतंप्रत्येकासाठी वेगवेगळे गोष्टीचा वेगवेगळा अर्थ असू शकतो हे कळालंथोडक्यात म्हणायला गेलं तर तुमच्या लोकांना खूपच फायदा होतो त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद

माझा प्रश्न छोटासा आहे

माझे लिंग थोडे डाव्या साईडला वाकलेले आहे

दिसताना आकार थोडा विचित्र आहे वाकलेलं दिसतं ते

सेक्स करायला काही अडचण होते का वाकलेलं असल्यावर

आशा करतो की सविस्तर उत्तर द्याल

धन्यवाद

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही तसेच गर्भधारणा होण्यासाठीही काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना झाल्या तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. बाकामुळे / वाकडेपणामुळे भविष्यात लैंगिक संबंधांच्या वेळी अडचण येत असेल किंवा वेदना जाणवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही.

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

पुरुषाचं शरीर :- https://letstalksexuality.com/male-body/