लिंगाला हाताळून जर तेच बोट मुलीच्या योनीत घालून fingring केली तर गर्भधारणा होते का…
म्हणजे बोटाला जर वीर्य लागलेलं आहे व त्याच बोटाने fingring केली तर?
वीर्य शरीराबाहेर असताना विर्यामधील शुक्राणू, वीर्य कोरडे होईपर्यंत जिवंत राहतात. हा कालावधी साधारणपणे मिनिटभराचा असतो. एका वीर्याच्या थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी फक्त एक पुरेसं असतं. त्यामुळे बोटाला वीर्य लागलेलं वीर्य विर्यामधील शुक्राणू/स्पर्म जिवंत असताना योनीमार्गात गेलं तर तो काळ स्त्रीच्या पाळीचक्रातील गर्भधारणेसाठी पूरक काळ असेल तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही.