प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग मोठा होनासाठी काय करावे
1 उत्तर

प्रत्येक पुरुषाच्या लिंगाची साईज वेगवेगळी असते. बाजारामध्ये लिंग वाढीसाठी जी औषधं उपलब्ध आहेत त्याच्या परिणांमांबाबत शंका आहेत. शिवाय अशा औषधांचे साईड इफेक्ट्सची निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र तुला लिंगाची साईज वाढवण्याची गरज का वाटली? यावर विचार कर. लिंगाची साईज ठराविकच असावी असा कोणताही नियम नाही. त्याच्यामुळं संभोगच्या आनंदावर काहीही परिणामही होत नाही. कदाचित पॉर्न क्लिप पाहून किंवा लिंग वाढीच्या औषधांच्या जाहिरातीमुळं किंवा मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं तुला लिंगाच्या साईजबद्दल प्रश्न पडला आहे का? यावर विचार कर. जर अजून काही प्रश्न पडला तर पुन्हा नक्की विचार.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 15 =