प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिगांचा ताठरपणा कसा वाढविण्यासाठी उपाय सांगा
1 उत्तर

पाहिलं आपण हे समजून घेऊ या की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेप्रकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो.
त्यामुळे लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. लिंगामध्ये ताठरपणा कमी वाटत असेल तर त्यासाठी आहार सुधारायला पाहिजे. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारलं की लिंगाचा ताठरपणाही वाढतो. वरील उपायांनी फरक न पडल्यास सेक्सॉलॉजिस्टना अवश्य भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 1 =