प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक संबंध महिला

तुमच्या वेबसाइट वरून बरीच चांगली माहिती मिळते. माझ्या मागच्या प्रश्नांची उत्तरे खूप चांगल्या पद्धतीने दिले धन्यवाद.

मी एक मुलगी असून 5 फूट 7 इंच माझी उंची आहे आणि माझा रंग गोरा आहे मी संबंध करत असताना बरेच पुरुष मला माझा रंग गोरा असल्यामुळे मला नाईटी किंवा जीन्स किंवा इतर आकर्षित कपडे घालायला लावतात असे का बरे मला समजत नाही शिवाय संबंध करत असताना पुरुष माझ्या मागील बाजूस गुदा मध्ये संबंध करायला लावतात. मला त्यामुळे आनंद मिळतो परंतु, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही ना?

1 उत्तर

तुमच्या उंचीचा, रंगाचा अन तुमच्या आयुष्यात असणा-या पुरुषांना काय आवडतं अन ते तुम्हाला असं का करायला लावतात. हे आम्ही कसं सांगू शकणार. ज्याला जे आवडतं त्यानूसार (एकमेकांच्या संमतीने) काय करावं हा ज्याचा त्याचा आवडीचा मार्ग आहे.
राहिला प्रश्न गुदामैथुनाचा. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यात प्रॉब्लेम काहीच नाही. फक्त काही काळजी घ्यावी. जशी की नियमित निरोधचा वापर करावा. गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं. तसंच निरोध वापरतानाही तो फाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा अंश असणारे वंगण किंवा थुंकीचा वापरही करता येतो.
सोबतची माहिती पहा.
https://letstalksexuality.com/dental-dam/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 20 =