प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैगिक प्रश्न: एक स्त्री एकापेक्षा जास्त जणांसोबत संबंध ठेवते का नाही ते कसे ओळखावे
1 उत्तर

प्रिय मित्रा/मैत्रिण,

या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोप्पं आहे. कोणत्याही स्त्रीने कोणत्याही व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत की नाही हे ओळखण्याचं कोणतही तंत्र किंवा फॉर्म्युला नाही. जोडीदारावर विश्वास ठेवणं हा एकमेव पर्याय आहे.

अनेक पुरुषांचा हा गैरसमज असतो की आपल्या जोडीदाराचे कोणासोबत तरी लैंगिक संबंध आहेत. अशी शंका मालकी हक्कामधून जास्त उत्पन्न होते. स्त्रीला केवळ एक लैंगिक वस्तू म्हणून पाहणं आणि मग तिच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणि बंधनं टाकणं हे पुरुषसत्ताक मानसिकतेचं लक्षण आहे. जितक्या लवकर यातून बाहेर पडता येईल तितक्या लवकर या मानसिकतेमधून बाहेर पड. जोडीदारावर विश्वास ठेवायला शिक. नात्यांमध्ये जितका मोकळेपणा असेल तितका विश्वास वाढतो. स्त्रीने कोणासोबत लैंगिक ठेवावे हे तिला ठरवू दे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 2 =