प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैगिक प्रश्न: “हस्तमैथुन करताना वीर्य पडल्यानंतर शिश्न नलिकेला आतुन जळजळ का होते?” ह्या प्रश्नावर पूर्वी तुम्ही असे उत्तर दिले होते की…

● “हस्तमैथुन करताना वीर्य पडल्यानंतर शिश्न नलिकेला आतुन जळजळ का होते?”

ह्या प्रश्नावर पूर्वी तुम्ही असे उत्तर दिले होते की…

“सामान्यतः हस्तमैथुन केल्यांनतर शिश्न नलिकेला अशी जळजळ होत नाही. उष्णतेमुळे किंवा लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांमध्ये अशी जळजळ होण्याची शक्यता असते. लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार हस्तमैथुनामुळे होत नाहीत. अशा प्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तींशी लैंगिक संबंध आल्यास असे आजार होऊ शकतात. प्रत्येकवेळी वीर्य बाहेर पडल्यानंतर किंवा लघवी करताना शिश्न नलिकेला आतून जळजळ होत असेल तर लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांची शक्यता आहे किंवा उन्हाळे लागले आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मोकळेपणाने डॉक्टरांशी बोला.”

● मलाही हस्तमैथुन करताना वीर्य पडल्यानंतर शिश्न नलिकेला आतुन जळजळ होते आणि थोड्या वेळानंतर लघवी आल्यासारखे होते, जेव्हा मी लघवी करतो तेव्हा फार थोडी लघवी होते, पण नंतर पुन्हा लघवी येते.

असे थोडा वेळ होत राहते. पण प्रत्येक वेळी वीर्य पडल्यानंतर असे होत नाही व माझा आजपर्यंत कोणत्याही स्त्रीशी लैगिक संबंध आलेला नाही.

तर मला लैंगिक आजार आहे का? जर “हा लैंगिक आजार नसेल” तर असा त्रास का होत असेल? ह्यावर उपाय काय?

Please reply! ?

1 उत्तर

तुम्ही बेवसाईट नियमित वाचता याबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुमचे कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध आलेले नाहीत त्यामुळं लैंगिक आजार असण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळं या समस्येच्या निवारणासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला जास्त फायदेशीर राहिल..

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 14 =