1 उत्तर
याचं उत्तर देणं अवघड आहे. याचा कोणताही नियम नाही. शिवाय लैंगिक सुख मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पुर्नविवाह, हस्तमैथुन किंवा केवळ लैंगिक संबंधासाठीचा जोडीदार अशा माध्यमातून लैंगिक सुख मिळवता येवू शकतं. हा प्रत्येक व्यक्तीचा लैंगिक अधिकार आहे. समाजामध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेवर अनेक बंधनं पुरुषसत्ताक मानसिकतेमधून लादली जातात. त्यामुळं अनेकवेळा स्त्रियांना त्यांच्या लैंगिक इच्छांबद्दल उघडपणे बोलता येत नाही. शिवाय प्रत्येकानं आपलं लैंगिक सुख कशातून मिळवावं ही प्रत्येकाची खाजगी बाब असू शकते.
आपले उत्तर प्रविष्ट करा