प्रश्नोत्तरेCategory: Private Questionशेजारी घरातील मूलीसोबत संबंध ठेवायचे आहेत यासाठी काय करु?

1 उत्तर

सेक्सची करण्याची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण सेक्स ही एक जबाबदार कृती आहे. यासाठी दोन्ही जोडीदाराची संमती, इच्छा आणि सुरक्षितता हे अत्यंत महत्वाचे आहे. जोडीदाराच्या संमतीशिवाय सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
जोडीदार नसेल तर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.
झवने यांसारखे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. तसेच हे शब्द हिंसक आणि अतिशय अपमानकारक वाटतात. काहीजणांना पर्यायी शब्द माहित नसतात, हे आम्ही समजू शकतो पण जाणूनबुजून असे शब्द वापरले जात असतील तर ते ताबोडतोब थांबवले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याच्यामध्ये आम्ही जाणार नाही पण समोरच्या व्यक्तीला देखील छान वाटावं, तुमच्याशी लैंगिकतेबद्दल बोलावसं वाटावं यासाठी पर्यायी शब्द वापरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा. झवने यासाठी लैंगिक संबंध, लैंगिक समागम, संभोग आणि इंग्रजीमध्ये सेक्स असे पर्यायी शब्द आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 3 =