प्रश्नोत्तरेसंभोग केल्याणतर वीर्य जास्तीत जास्त बाहेर का येत ?

1 उत्तर

संभोग केल्यानंतर योनीतून वीर्य बाहेर येणं अगदी स्वाभाविक आहे. सगळेच वीर्य बाहेर आले असे म्हणता येत नाही. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती असते. शिवाय गुरुत्वाकर्षणाचे नियम वीर्यादेखील लागू होतात. त्यामुळे अर्थातच संभोगानंतर हालचाल केल्याने वीर्य बाहेर येऊ शकते.  मात्र यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. वीर्य बाहेर आल्यामुळे गर्भधारणेमध्ये काहीही अडचण येत नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात. त्यातील गर्भधारणेसाठी एकच पुरेसं असतं. गर्भधारणा होत नसेल त्यासाठी फक्त योनीतून वीर्य बाहेर येणं एवढंच कारण पुरेसं नसतं. अशावेळी गर्भधारणा होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 18 =