प्रश्नोत्तरेसंभोग केल्यानंतर योनीतुन वीयॅ संपूर्ण बाहेर योतो

1 उत्तर

संभोग केल्यानंतर योनीतून काही प्रमाणात वीर्य बाहेर येणं अगदी स्वाभाविक आहे. सगळेच वीर्य बाहेर आले असे म्हणता येत नाही. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती असते. शिवाय गुरुत्वाकर्षणाचे नियम वीर्यादेखील लागू होतात. त्यामुळे अर्थातच संभोगानंतर हालचाल केल्याने वीर्य बाहेर येऊ शकते.  मात्र यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. वीर्य बाहेर आल्यामुळे गर्भधारणेमध्ये काहीही अडचण येत नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात. त्यातील गर्भधारणेसाठी एकच पुरेसं असतं. गर्भधारणा होत नसेल त्यासाठी फक्त योनीतून वीर्य बाहेर येणं एवढंच कारण पुरेसं नसतं. अशावेळी गर्भधारणा होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 2 =