सर माझे लग्न झाले आहे मला दोन मुले देखील आहेत पण माझा प्रश्न असा आहे कि माझा खुपच जवळचा मित्र आहे त्याला तीन वर्षे झाले अजून मुल होत नाही आणि तो आता मला सारखा सारखा त्रास देत आहे कि मला तुमच्याकडुन मुल हवंय आणि हि गोष्ट त्याने त्याच्या बायकोला पण सांगितले आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि हा निर्णय त्याने का घेतला मला कळत नाही मी त्याला खुपच समजावून सांगितले पण तो ऐकत नाही आता मला एकिकडे विहीर आणि दुसरीकडे आड असा मोठा प्रश्न आहे तरी कृपया मला मदत करा

2,780
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसर माझे लग्न झाले आहे मला दोन मुले देखील आहेत पण माझा प्रश्न असा आहे कि माझा खुपच जवळचा मित्र आहे त्याला तीन वर्षे झाले अजून मुल होत नाही आणि तो आता मला सारखा सारखा त्रास देत आहे कि मला तुमच्याकडुन मुल हवंय आणि हि गोष्ट त्याने त्याच्या बायकोला पण सांगितले आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि हा निर्णय त्याने का घेतला मला कळत नाही मी त्याला खुपच समजावून सांगितले पण तो ऐकत नाही आता मला एकिकडे विहीर आणि दुसरीकडे आड असा मोठा प्रश्न आहे तरी कृपया मला मदत करा
let's talk sexuality asked 4 years ago

1 Answers
let's talk sexuality answered 4 years ago

माफ करा. पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास उशीर झाला पण काही दिवसांपूर्वीच ह्याचे उत्तर दिले आहे. परत आणखी एकदा तेच उत्तर इथे देत आहोत.

दोस्त, खरं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमची इच्छा होत नाही तर तुम्ही त्याला तसे स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगा.आपल्याला पटत नसलेल्या गोष्टीला ठाम नकार देता येणं महत्वाचं आहे. मग ती कितीही जवळची व्यक्ती का असेना! त्यामुळे भविष्यात दोघांसाठी उद्भवू शकणारी अवांच्छित स्थिती रोखता येईल.

आता तुम्ही जी माहिती प्रश्नात दिली आहे त्या वरून तुमच्या मित्राची नेमकी काय इच्छा आहे हे मात्र समजत नाही.तुम्ही अधिक खुलासा केला तर बरं होईल. आज विज्ञानाने उपलब्ध केलेली साधनं पाहता मूल होण्यासाठी प्रत्येक वेळी स्त्री पुरुषाचा शरीर संबंध होण्याची गरज नसते. स्त्री बीज अथवा पुरुष बीजाशी संबंधित समस्या असेल तर बीज विकत घेता येते तसेच ते डोनेटही करता येते. अगदी टोकाच्या परिस्थितीत सरोगसीचा (दुसरया स्त्रीचे गर्भाशय उपयोगात आणणे) पर्याय आहे. त्याच्याही अगोदर खरे तर मूल दत्तक घेण्याचा सोपा आणि चांगला पर्याय आहे.

मित्राच्या अशा विनंतीचा परिणाम तुमच्या मैत्रीवर, तुमचे जोडीदार आणि कुटुंबावर होणार. यातील गुंतागुंत तुम्हा दोघांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती कदाचित समजू शकणार नाही. शेवटी, तुमचा मित्र ह्या बाबतीत त्याच्या पत्नीवर काही अन्याय तर करीत नाही ना अशी एक शंका मनात आहे ती व्यक्त करून उत्तर इथे थाबवत आहे. आपल्या मनाला विचारून योग्य तो निर्णय घ्या.