सर हस्तमैथुन केल्याने किंवा सेक्स केल्याने टेस्टोस्टेरॉन levl कमी होते का व ती पूर्वरत केव्हा होते?
हस्तमैथुन किंवा सेक्स आणि टेस्टोटेरॉनची लेवल कमी होण याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. तुम्हाला टेस्टोटेरॉन ची लेवल कमी झाली असे का वाटते? टेस्टोटेरॉन ची लेवल कमी होण्यामागे वेगळी कारणे असू शकतात.जर अशी काही शंका असल्यास किंवा समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते योग्य ते निदान आणि उपचार करतील.