प्रश्नोत्तरेसुंदर मुली पाहील्यावर मुलानां जसा उताविळपणा होतो तसा मुलीनां होत नाही का तिलाही भावना आहेत

1 उत्तर

तुमच्या प्रश्नातच तुम्ही उत्तर दिलं आहे “तिलाही भावना आहेत". निसर्गतः मुलांप्रमाणे मुलींच्याही मनात लैंगिक इच्छा, भावना निर्माण होतात. वयात येताना मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात. त्यामुळे विरुद्धलिंगी किंवा समलिंगी आकर्षण निर्माण होणे हे अगदी नैसर्गिक आहे. मात्र मुलींना जन्मापासूनच अनेक बंधनं घातली जातात. मुलांच्या तुलनेत मुलींना भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या समाजामध्ये मोकळे वातावरण, जागा आणि खूप कमी संधी उपलब्ध असतात. एखाद्या मुलीने या बंधनांच्या पलीकडे जाऊन मोकळेपणाने याविषयी बोलायचा प्रयत्न केलाच तर तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एखादी मुलगी जर तिच्या लैंगिक भावना व्यक्त करत असेल तर तिच्या भावनांचा आणि त्या व्यक्त करण्याचा आदर करायला हवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 5 =