समलैंगिकता asked 7 years ago

समलैंगिकता व हार्मोन्स चा काही संबंध असतो का? मी एक समलैंगिक मुलगा आहे. मला वाटतं की माझी समलैंगिकता जन्मजात व नैसर्गिक आहे आणि माझा स्वभाव थोडा मुलिसारखा आहे. तर माझ्या आईवडिलांना वाटतं की मी समलैंगिक नाही कारण मी आजपर्यंत तसं वागलो नाही तसेच माझ्या एकलकोंडेपणामुळे मला समलैंगिकतेचे विचार येत आहे. त्यामुळे ते माझी हार्मोन्स टेस्ट करणार आहेत.

1 उत्तर

मित्रा, समलैंगिकता आणि हार्मोन्स यांचा काहीही संबंध नसतो. लैंगिक कल ही एक नैसर्गिकच गोष्ट आहे. पुण्यात समपथिक नावाची संस्था समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी अनेक कार्यक्रम राबविते आणि त्यांच्या अधिकारांचे मुद्दे घेऊन काम करते. तुला तिथे सर्वप्रकारची मदत मिळेल. बिंदूमाधव खिरे हे ती संस्था चालवतात आणि या विषयावर संवेदनशीपणे, मुलभूत काम करणाऱ्या भारतातील काही लोकांपैकी ते आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशा टेस्ट्स बिनकामाच्या आहेत. त्यातून काही सिद्ध होत नाही. तुला त्यांना प्रत्यक्ष बोलता येईल. त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे ९७६३ ६४० ४८०. सोमवारी ८-९ संध्याकाळी या वेळेत फोन कर. तुझ्या पालकांच्या शंकांचे निरसन कसे करता येईल आणि अशा इतर सर्वच मुद्द्यांवर तुला त्यांच्याशी संवाद साधता येईल. ऑल दि बेस्ट…

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 19 =