प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्समधील सुप्त ईच्छा

पत्नीशी सेक्स करताना दरवेळी काहीतरी नवीन करावेसे वाटते. त्यामुळे त्यातील ताजेपणा टिकून राहतो. जसे की ओरल सेक्स करणे, वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना परमोच्च क्षणापर्यंत घेऊन जाणे, दोघांनी एकमेकांना जे हवे ते दिलखुलासपणे देणे व स्वताला जे हवे त्याची ईच्छा व्यक्त करणे, हे सर्व दोघांच्या मनाप्रमाणे घडून आले तर सेक्स परीपूर्ण होतो.

हे जर व्यवस्थित चालू राहिले तर आयुष्य उत्तम पध्दतीने जगता येईल. दोघांनाही त्यांच्या वाट्याचे सुख पूर्णपणे भोगता येऊ शकेल. पण बायकोला परिपूर्ण संभोग म्हणजे काय हेच माहिती नाही. ती कायम तोच पठडीतला (कॉमन) संभोग करण्यात (ऊरकण्यात) धन्यता मानते. तीला त्यापुढे काहीहि जाणून घ्यायचे नाहीये. कदाचित या मानसीकतेमागे जुन्या रुढी परंपरा व नवीन काही जाणून घेण्याविषयी अनिच्छा व आपण आहोत त्याच पध्दतीने राहण्याचा हट्ट, ही कारणे असु शकतात.

पण मला हवा तसा संभोग करण्यासाठी काय करावे ?

1 उत्तर

तू विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. असं होवू शकतं कारण आपल्या समाजामध्ये लैंगिकतेबद्दल अनेक गैरसमजूती मुला-मुलींमध्ये लहानपणापासून ठासून भरल्या जातात. विशेषतः मुलींच्या लैंगिकतेवर जास्त नियंत्रण ठेवलं जातं. यातून त्याच्या मनामध्ये सेक्सविषयी एक ठराविक साचेबध्द प्रतिमा तयार होवू शकते. ही साचेबध्द प्रतिमा तुटणं अनेकवेळा लगेचं शक्य नसतं यासाठी काही काळ जाणं आवश्यक आहे. तुम्ही एकमेकांना किती समजून घेता यावर ते अवलंबून आहे.

अनेकवेळा जोडीदाराला संभोगाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती नसू शकते. अशी माहिती विविध डॉक्टरांच्या किंवा समुपदेशकांच्या मदतीने देता येवू शकते. किंवा याबद्दलची अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत ती देखील वाचायला देता येवू शकतील.

तुझ्या प्रश्नातील अजून एक भाग महत्वाचा आहे, तो म्हणजे तुला हवा तसा संभोग करणं. आयुष्य जगताना सर्वांना सगळं काही मिळेल अशी आशा ठेवणं चुकीचं आहे. प्रेमामध्ये जोडीदाराचा आदर करणं, त्याला समजून घेण्यासाठी स्वत: झिजणं महत्वाचं असतं. अन्यथा संभोग केवळ शरीर सुखासाठी होईल. मानसिक सुखाचा विचार होणं तितकच आवश्यक आहे संभोगामध्ये. तू यावर विचार करशील अशी आशा आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा पुर्ण अधिकार आहे त्यावर सामान्य व्यक्ती गदा आणू शकत नाही. तसं करणं कायद्यानं गुन्हा आहे.

तिला विचार करायला वेळ दे. जर दोघांच्या आवडीनिवडी जुळत नसतील तर दोघांच्या संमंतीने तुम्हाला वेगळं होण्य़ाची कायदेशीर तरतूद आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 8 =