प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्सला वायची मर्यादा आहे का मला 45 ते 50 वय असणाऱ्या भाभी खूप आवडतात त्याचा बरोबर सेक्स करू का

1 उत्तर

मित्रा, तुझ्या ‘सेक्सला वयाची मर्यादा असते का?’ या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. कायद्यानुसार कोणत्याही दोन सज्ञान व्यक्ती लैंगिक संबंध ठेवू शकतात. पण तुझा प्रश्न एवढ्यापुरता मर्यादित नाही. यात अनेक पैलू आहेत आणि त्याचा विचार करायला हवा.

१. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुला भाभी सोबत सेक्स करावासा वाटतो. पण त्यांना तसे वाटते का ? कोणत्याही लैंगिक नात्यामध्ये दोन्ही जोडीदारांची संमती महत्वाची.

२. दूसरे म्हणजे, त्यांची सेक्सची इच्छा आहे की नाही तुम्हाला कसे कळणार? त्यांना तुम्ही कसे विचारणार? त्यांना जर तुम्ही सेक्ससाठी विचारलेले आवडले नाही तर त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेव.

३. अशा प्रकरच्या नाती समाजामध्ये मान्य नसल्याने, अशा नात्यामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. म्हणूनच अशी नाती प्रस्थापित करताना त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का ? याचा विचार दोघांनीही करायला हवा.

जे काही ठरवशील ते ठरवताना वरील मुद्द्यांचा नक्की विचार कर. शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाची जबाबदारी देखील !

कोणत्याही व्याक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असताना एकमेकांची संमती, सुरक्षितता, लिंग सांसर्गिक आजार आणि गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करणे योग्य. काळजी घे. Be safe.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 4 =