प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स करण्याची इच्छा होते काय करू ?

मी 24 वर्षीय तरुण आहे. माझ्या मनात अनेक वाईट कल्पना येतात. रोज हस्तमैथुन करुन सुद्धा माझी भुक भागत नाही. एकंदरीत सांगायाचे तर मला फार मुलीचे येड लागले आहे मनात फार sexual कल्पना येतात.

रोज असे वाटते कि कोणत्यातरी मुलीकडे जाऊन सेक्ससंबंध ठेवावे. काहीच control होत नाहिये. Please help मी?

1 उत्तर

लैंगिक इच्छा असणे, मनात येणे, लैंगिक कृती करावीशी वाटणे, कोणीतरी ओळखीतील व्यक्ती जवळ आहे अशी कल्पना करणे, हे तुमच्या वयात अगदी स्वाभाविक आहे. त्यात काही वाईट नाही. घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यावर हस्तमैथुन हा एक अगदी सुरक्षित उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला मुलींचे वेड वगेरे लागले आहे हे मनातून काढून टाका. रोज हस्तमैथुन करावेसे वाटणे, करणे यातही काही गैर नाही.

पण जर या सर्व कारणांनी मानसिक किंवा शारीरिकरित्या तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, इतर कुठल्याही गोष्टीत मन रमत नसेल, काम किंवा अभ्यासावर याचा दुष्परिणाम जाणवत असेल, तुमच्यावर तुमचे नियंत्रण राहणार नाही असे काही घडत असेल, इतरांना किंवा तुम्हाला धोकादायक स्थितीत तुम्ही टाकत असाल तर मात्र तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे असे समजा. जवळच्या एखाद्या समुपदेशक किंवा सेक्सोलॉजिस्टची मदत घ्या.

Mayue replied 1 year ago

मला हस्तमैथुन करण्याची इच्छा जास्त होते या वरती उपाय.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 11 =