प्रश्नोत्तरेसेक्स करताना रक्त आले तर सेक्स करणे थांबवावे का.? सेक्स करताना रक्त आले तर काळजी करण्यासारखे आहे का.? रक्त आले सेक्स करताना कोणती काळजी घ्यावी.???

1 उत्तर

कदाचित पहिल्यांदा सेक्स करताना स्त्रियांच्या योनीपटलावराचा पडदा फाटू शकतो आणि त्यातून रक्त देखील येवू शकतं. परंतू हे सगळ्याच मुलींबाबत घडेल असं अजिबात नाही. जर संभोग करताना नेहमी रक्त येत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या. संभोग करताना असं नेहमी रक्त येत नाही. किंवा पुरुषांमध्ये लिंगावरची त्वचा सहज मागे न जाता संभोग करताना जास्त ताणली गेली तर फाटू शकते. यातून रक्त देखील येवू शकतं.अशावेळी डॉक्टरांना दाखवणं जास्त फायदेशीर राहतं. याव्यतिरिक्त विशेष काही कारण नसतं लिंगातून रक्त येण्यासाठी. जर तुमच्याबाबतील याव्यतिरिक्त किंवा असं काहीसं झालं असेल तर डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

रक्त आल्यावरच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला सेक्स करताना त्रास होत असेल, वेदना होत असेल तर ताबडतोब सेक्स थांबवावा. सेक्स मध्ये तुमची आणि जोडीदाराची इच्छा, संमती आणि आनंद महत्वाचा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 13 =