1 . लग्ना आधी एखादया मुली सेक्स केला असेल तर तिला लग्ना नंतर सेक्स करताना प्रॉब्लेम येतात का… ? किंवा तिच्या होणाऱ्या नवरयला हे कळू शकते का की मुलीने आधी सेक्स केलाय अस समजू शकते का…?
आपल्या समाजामध्ये मुलींची/स्त्रियांची लैंगिकता, लैंगिक भावना किंवा त्यांनी व्यक्त होणे हेच मुळात मान्य नाही. पूर्वीपासूनच स्त्रियांच्या लैंगिकतेवर बंधन आणि नियंत्रण घातली गेली आहेत. यातूनच मुलीच्या कौमार्यासारख्या चुकीच्या पद्धती रुढावल्या गेल्या आहेत. यामुळे लग्नाआधीच्या लैंगिक संबंधांबद्दल मुला-मुलींच्या मनामध्ये गैरसमजुती आणि भीती असते.
मुलीने अथवा मुलाने लग्नाआधी लैंगिक संबंध केले की नाही हे समजण्याचा कोणताही मार्ग नाही. मुलीच्या लग्नाआधीच्या लैंगिक संबंधाविषयी प्रश्न उभे केले जातात पण मुलांच्या लग्नाआधीच्या लैंगिक संबंधांबद्दल काय?
कोणी, कुणाबरोबर, कधी लैंगिक संबंध ठेवायचे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे लग्नाआधीचे लैंगिक संबंध योग्य अयोग्य हे ठरविण्यापेक्षा ते सुरक्षित असण्यावर विचार केलेला चांगला. मात्र यातील सहभागी व्यक्तींची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे गरजेचे आहे.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.
लग्नापूर्वीचा प्रणय भाग-१ ची लिंक देत आहोत. कृपया या लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/sex_before_marriage_1/